Instructions: This is unicode text. Follow these instructions:
IE:Click on View Menu -> Encoding -> Select Unicode UTF-8
Firefox: Click on View Menu -> Character Encoding -> Select Unicode UTF-8.
"पु ल" या दोन अक्षरांनी मराठी मनासाठी जे काही करून ठेवलं आहे त्याबद्दल काय लिहावे? पण आता मी बाळकृष्ण भगवंताने जे काही केलं आहे त्याबद्दल लिहीणार आहे. याची ओळखही म्या पामराला पुल-सुनिताबाईंनीच करून दिली त्यामुळे हा blog जो कोणी वाचेल त्याने "एक आनन्दयात्रा कवितेची" या ध्वनिमुद्रिका जरूर ऐकाव्यात.
आम्ही असे कधी-कधी ह्या कविता ऐकतो आणि ऐकतच राहतो. कधी डोळ्यांमधून आसवं गळू लागतात कळत नाही. विशेषतः पुल जेव्हा "निळी ये रजनी मोतिया सारणि" असं भैरवी मध्ये गाऊ लागतात तेव्हा एकदम डोळ्यांत आसवं. हा एक अविस्मरणीय अनुभव आहे. पुन्हा बोरकरांनीच म्हटल्याप्रमाणे "भाग्य केवढे! आपुली चाले यातूनच यात्रा, आपुली चाले यातूनच यात्रा!" यावर विश्वास बसतो.
बा भ बोरकरांच्या कविता हा एक नितांत-सुन्दर विषय आहे. त्यांच्या कवितेबद्दल काही वेगळे लिहावे ही काही माझी प्रतिभा नव्हे, त्यामुळे मी त्यांच्या ज्या कविता पाठ केल्या आहेत त्या फक्त लिहिणार आहे.